DPT NEWS NETWORK🗞️✍️प्रतिनिधी:- योगेश साबळे
मुंबई:- दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मनोहर जोशी वयाच्या 86 व्या वर्षी
निधन झाले. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा सुरु झाली.
नगरसेवक माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष असा त्याचा जीवन प्रवास होता दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार पार पडला.
मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, नारायण राणे असे बरेच नेत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.