DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा
धुळे: सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायतीची १०१ वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले आहे. या विषयीचे आदेश निघाले असून प्रशासकपदी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात येणार . पिंपळनेरला नगर परिषद व्हावी यासाठी काही वर्षांपासून शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख डॉ.तुळशीराम गावित व आमदार मंजुळा गावित यांचे प्रयत्न सुरू होते. ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करावे, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सप्टेंबर २०११ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानूसार आता अधिसूचना निघाली. ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर झाल्याने विकास कामाला चालना मिळेल, अशी माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली. पिंपळनेर येथे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने फटाके फोडीत व एकमेकांना पेढे भरीत जल्लोष करीत आमदार मंजुळाताई गावित यांचे आभार व्यक्त केले.