DPT NEWS NETWORK 🗞️✍️
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला नवीन निवडणूक चिन्ह “तुतारी” मिळाल्याबद्दल धुळे शहरांमध्ये रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
धुळे :- भाजपाच्या दबावाखाली येऊन निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह गद्दाराना दिले. त्या पार्श्वभूमीवर काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला नवीन निवडणूक चिन्ह तुतारी दिले. “तुतारी” हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पवित्र वाद्य होते .तुतारी वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अन्यायाविरोधामध्ये लढा उभारून स्वराज्याची स्थापना केली. आणि आज तेच पवित्र वाद्य तुतारी शरद पवार साहेबांच्या पक्षाला मिळाले. याबाबत सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
पक्षाला नवीन चिन्ह तुतारी मिळाल्याबद्दल पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी जुने धुळे महानगरपालिका समोर एकत्र येऊन फटाके फोडून ,डफ वाजून ,मिठाई वाटून चिन्हाच्या अनावरण केले. जल्लोष करून आनंद व्यक्त केला. एकमेकांना मिठाई खाऊ घालून शुभेच्छा दिल्या. घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. “महाराष्ट्राचा बुलंद आवाज…शरद पवार शरद पवार “,”वाजवा तुतारी,गाडा गद्दारी” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजीत राजे भोसले, नंदू येलमामे, डी टी पाटील, यशवंत पाटील, रईस शेख, शकीला बक्ष, उषा पाटील, बिका नेरकर, राजू डोमाळे, राजू चौधरी, अमित शेख, भोला सैंदाणे, जितू पाटील, रामेश्वर साबरे ,भाग्येश मोरे ,प्रशांत बोरसे ,निखिल वाघ, विश्वजीत देसले ,गोलू नागमल, बरकत शाह,संदीप पाटील,सोनू घारु,दीपक देवरे, चेतना मोरे, गायत्री पाटील, भूषण पाटील, जयश्री घेटे ,जाकीर शेख, डॉमिनिक मलबारी, तसवर बेग , शोयाब अन्सारी,राजू मशाल, युसुफ शेख, मनोहर निकम, आकाश बैसाणे, सलमान खान, समद शेख, मसूद अन्सारी, सोनू गुजर ,राजेंद्र सोलंकी, राजेंद्र चौधरी, प्रशांत चौधरी, कल्पेश मगर ,राहुल महाजन ,विशाल बोरसे, अशोक गवले, सुरेश जवरास ,सजन बागुल, राजेंद्र सोनवणे ,ईश्वर जाधव, जीवन चव्हाण आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.