DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :संत गाडगे महाराज जयंती परिठ समाज साक्री तालुका शाखेतर्फे साक्री शहरातील गोल्डी हॉटेल जवळ उत्साहात साजरी करण्यात आली.
संत गाडगे महाराज यांनी विद्रोही संत परंपरेचा कणा मजबूत करीत अंधश्रद्धेला मूठमाती देऊन प्रबोधनाची अविरत चळवळ कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत सोप्या वाणीतून पोहोचवली. कोणत्याही अपेक्षेशिवाय निराधार गोरगरीब कुटुंबांना आश्रय दिला. त्याचे हेच विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील परीठ समाजाच्या तर्फे करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम साक्री चे नायब तहसिलदार शिंपी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले तर गाडगे महाराजांच्या जीवन चरित्रावर ज्येष्ठ पत्रकार सतीश पेंढारकर यांनी प्रकाशझोत टाकला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूषण चव्हाण, आबा शिंदे, जितेंद्र शिंदे, भटू चव्हाण आदींनी मेहनत घेतली होती.
कार्यक्रमाला नगरसेवक सुमित नागरे , नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक
बाळा शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया, जयश्री पगारिया, पत्रकार विजय भोसले, प्रमोद नागरे, गोटूभाऊ जगताप,सतिष मोहिते, विनोद पगारीया,गोविंदा सोनवणे, बंडू गीते, किशोर वाघ,कुणाल घरमोडे ,राजेद्र साळुंके, माया मोरे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे साक्री तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, उपाध्यक्ष अकिल शहा, सचिन सोनवणे, पत्रकार महेंद्र चंदेल, किशोर गादेकर, रतनलाल सोनवणे, शरद वाघ, नितीन मोहिते, डी.एम. मोहिते, एन.जी. मोरे, व तसेच आजी-माजी नगसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.