DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदीले
भिवापूर :- स्थानिक राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी असलेल्या कू. खुशी सोनकुसरे या विद्यार्थिनीने राज्य शासनाच्या वतीने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला.
वर्ग आठ ते दहा या गटात खुशीने हा पुरस्कार प्राप्त केला आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवा योजना विभाग, शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद, नागपूर. जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नागपूर येथील अध्यापक सभागृहात नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. शाळेच्या वतीने कलाशिक्षक सुरेश राठोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बालकला चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी “झाडे लावा झाडे जगवा” या विषयावर चित्र रेखाटून रंग भरले.
उपशिक्षणाधिकारी सुनील बनसोड, सहाय्यक उपसंचालक दीपक लोखंडे, कलाध्यापक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बारई प्रख्यात चित्रकार प्रा. सदानंद चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय विद्यालयातील कु. जानवी कामडी, किंजल नागभूषण येवले, कल्याणी विनोद वाढई या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त केले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींना कलाशिक्षक सुरेश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव शेख मॅडम, सहसचिव शहाला शेख, विद्यालयाचे प्राचार्य इमरान शेख, पर्यवेक्षक फारूक शेख, गजानन मुरकुटे, अंगद शिवरकर, अजय चांदोरे, अजहर कुरेशी, अरविंद टिकले, शारीरिक शिक्षक सलीम शेख, गणेश बोरकर, प्रमोद नाकाडे, ज्ञानेश्वर तलमले,फुला भागवत, वंदना हुकरे, कीर्ती मेहरकुरे, प्रणिता घुमे, शुभांगी बालपांडे, शोएब कुरेशी, रेहान सय्यद, शेषराव चौधरी, नाना दिघोरी इत्यादींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.