नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इंदवे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गुणदर्शनाने गावकऱ्यांची जिंकली मने

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : इंदवेयेथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक गुणदर्शनाने ग्रामस्थांची मने जिंकली. इंदवे येथे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात रात्रीच्या वेळी इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात देशभक्ती पर गाणी, ‌प्रभू श्रीराम व गणरायाच्या आगमनाचे स्वागत, मंगळागौर, कानबाई ची गाणी, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटीका, स्वच्छतेचे भारुड, हुंडाबदीवरील प्रबोधन नाटीका, छत्रपती शिवरायांचे शौर्यवर्णन, मराठी राजभाषा गौरव, शिक्षणाचे महत्त्व लक्षात आणून देणारी गाणी, समूह नृत्य अशा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. गावातील तमाम जनतेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करीत बक्षिसांचा भरभरून वर्षाव केला.
इंदवे गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ कविता देवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित अकलाडे, यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे, उपाध्यक्ष अनिल जाधव, राजेंद्र पवार, नूतन माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही. एम. देवरे ,आबासाहेब दिनकर देवरे,यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिक श्री विलास व सौ.शशिकला देवरे यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू देऊन आनंद व्यक्त केला.
या सांस्कृतिक कार्यक्रमांचे संपूर्ण दिग्दर्शन सहशिक्षक विजय भदाणे यांनी केले होते. साडेतीन तास चाललेल्या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक डॉ. नरेंद्र खैरनार यांनी केले. महिला पालकांनी विद्यार्थ्यांची रंगभूषा व वेशभूषा करून देण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पदोन्नती मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी अहिरे/ सोनवणे, संदीप जगदाळे, मोहन गावीत, पाराजी पैठणे, भारती बेडसे, गुलाक्षी पाटील, प्रविण भदाणे, गोकुळ बोरसे, गफ्फार शहा, मधुरम साऊंड सिस्टीम यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:23 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!