तऱ्हावद ते नादर्डे गावा दरम्यान पुलाखाली मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला शहादा तालूक्यात एकच खळबळ
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
शहादा: किराणा घेण्यासाठी गेलेल्या एसटी बस वाहक (कंडक्टर) तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत नांदर्डे ते तऱ्हावद रस्त्या दरम्यान पुलाच्या खाली अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. शरीराचे अवयव परिसरात ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने शहाद्यात ऐकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण शहरात पसरलेले दिसून येत आहे.
वाहकाचा मारेकरी कोण ? वाहक मराठे पंधरा किलोमीटर पोहचले कसे? तूकडे करणारे मारेकरी किती? पोलिसांची भीती देखील राहिली नाही? असे अनेक प्रश्न जनमानसात उपस्थित होवू लागले आहेत. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील सदाशिव नगरात राहणारे राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३) हे राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारात एस.टी .बसचे वाहक होते. दि.१३ मार्च रोजी राजेंद्र मराठे हे दुपारी चार वाजेच्या सुमारास किराणा घेवून येतो असे घरी सांगून गेले. परंतू तेथून वाहक राजेंद्र मराठे हे कुठे गेले? ते कळाले नसल्याने ते गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होते.? कुटुंबियांसह नातलगांनी परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. अखेर शहादा पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली.
त्यातच १६ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास डायल ११२ वर कॉल आला. तऱ्हावद ते नांदर्डे गावा दरम्यान असलेल्या पुलाखाली एका पुरुषाचा मृतदेह जळलेल्या व तुकडे- तुकडे झालेल्या अवस्थेत दिसून आले. असे सांगण्यात आले. त्या माहितीच्या आधारे शहाद्याचे पोलिस स्टेशन चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुलाच्या खाली पोलिसांना जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तसेच परिसरात त्या मृतदेहाचे अवयव अन्य ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले.
हा मृतदेह कोणाचा? याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. परंतू रात्री बराच उशिर झाल्याने पोलिस शहाद्यात परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी जावून पुन्हा तपास सुरु केला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी घटना स्थळी करीत असतांना शहादा पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी हरविल्याची नोंद असलेली व्यक्तीचे वर्णन व मयताच्या उजव्या पायाचा अंगठा नातेवाईकांनी ओळखला. त्यामुळे जळालेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले एस.टी. बस वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे अधिक तपासासाठी शहादा पोलिसांनी धुळे वैद्यकिय विभागाच्या पथकासह श्वान पथकाला ही घटनास्थळी बोलविले. यावेळी वैद्यकिय विभागाच्या पथकाने घटनास्थळी मयताची पार्थिवाची शव चिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मयताची मुलगी भावना राजेंद्र सरोदे (मराठे) यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार मारेकरी अनोळखी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.