DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- कर वसुली करीत असलेल्या ग्रामपंचायत शिपायाशी अकारण वाद घालत त्याला दोघा भावांनी मिळून जबर मारहाण केली. सदर घटना मंगळवारी दुपारी झिलबोडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या (दि.26) बोरगाव (शास्त्री) येथे घडली.
किशोर नामदेव भोयर आणी प्रमोद नामदेव भोयर रा. बोरगाव अशी आरोपिंची नावे आहेत. त्यापैकी किशोर हा माजी ग्रामपंचायत सदस्य असल्याचे समजते. फिर्यादी बंडू पांडुरंग बिरे (58) रा. झिलबोडी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोयर बंधू विरुद्ध भादवीच्या 353, 427, 294, 506, व 34 कलमानम्वये गुन्हा दाखल केला.
फिर्यादी पांडुरंग बिरे हे झिलबोडी गट ग्रामपंचायतमध्ये शिपाईपदी काम करतात. मंगळवारला पाणी व घर कर वसुलीकरिता ते बोरगाव येथे गेले होते. कर वसुलीचे काम करीत असतांना ग्रामपंचायतचे माजी सदस्य असलेल्या किशोर भोयर याने त्यांच्याशी वाद घातला. ग्रामपंचायत सदस्य असताना मला मानधनाची रक्कम मिळाली नाही, ती तू मला आणून दे म्हणत आरोपी भोयर याने बिरे यांना आधी शिवीगाळ व नंतर मारहाण केली. दरम्यान किशोरचा भाऊ प्रमोद हा सुद्धा घटनास्थळी पोहचला व त्यानेही बिरेना मारहाण केली. यादरम्यान बिरेंकडे असलेल्या कर वसुली बुकाच्या पावत्यासुद्धा आरोपीनी फाडल्याचे समजते. बिरे यांनी सायंकाळी घटनेची तक्रार पोलिसात नोंदविली. हेड कॉन्स्टेबल प्रफुल माहुरे पुढील तपास करीत आहे.