DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पुणे: पुणे येथे भरदिवसा चंदननगरच्या चौकात प्रेमिकेची चाकूने सपासप वार करून हत्या करुन स्वतः विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस मा.मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे. किरण अशोक शिंदे असे जामीन झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्या बाबत पूर्ण माहिती अशी की, दि.११/०६/२०१९ रोजी चंदननगर येथील चौकात आरोपी किरण शिंदे याने त्याची प्रियसी ची मित्रा बरोबर प्रेमसंबंध चालू असल्याच्या संशयावरून चाकूने वार करुन हत्या केली होती. त्या वेळी चौकात जमलेल्या लोकांच्या समोर चाकूने वार करून आरोपी त्या ठिकाणांवरून पळून गेला होता. त्या नंतर चंदननगर चौकात ट्रॅफिक च्या ड्यूटी वर असलेल्या पोलिसांनी सदर महिलेस वैद्यकीय उपचार कामी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता. त्या नंतर आरोपने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तदनंतर तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. तेंव्हा पासून आरोपी येरवडा कारागृहात बंदिस्त होता. कारागृहात असताना आरोपीने ॲड. नितीन भालेराव व ॲड अमित ईचम यांच्या द्वारे मा. उच्चन्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. त्या नंतर आरोपी यास २० जून २०१९ रोजी अटक केली असून आरोपी याची केस सेशन्स कोर्टात चार्ज झाली आहे परंतु सदर न्यायप्रक्रियेत विलंब होत असून १८ पैकी सरकार पक्षातर्फे केवळ ६ च साक्षीदार मागील २ वर्षात तपासण्यात आले असून एकूण साक्षीदार तपासण्यास विलंब होणार असल्याचे आरोपी पक्षातर्फे सांगण्यांत आले त्या वेळी आरोपी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश मा. न्यायाधीश श्री. माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिले आहेत अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.