DPT NEWS NETWORK🗞️✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पुणे : धरणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एक कोटी साठ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणातील दोन आरोपींना जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, बलकारसिंग भोंडसरदार (२०) व बलविंदरसिंग असे जामीन मंजूर झालेल्या आरोपींचे नावे आहेत. या बाबत अधिकची माहिती अशी कि,
दि. १७/०२/२०२४ रोजी धरणगाव येथील दुर्गेश इम्पेक्स प्रा.ली.कंपनीतील लेखापाल हे त्यांच्या कंपनीच्या बँकेच्या खात्यातून एक कोटी साठ लाख रुपये कंपनीच्या गाडीतून घेऊन येत असताना आरोपीतानी त्यांच्या कडील स्कॉर्पियो गाडीने धडक मारून गाडीतील लेखापाल यांना व इतर लोकांना मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या पैश्यांच्या ३ बॅगा घेऊन पळून गेले होते. तपासादरम्यान धरणगाव पोलिसांनी आरोपी बलकारसिंग भोंडसरदार (२०) व बलविंदरसिंग यांना अटक केली होती. त्या नंतर आरोपींची रवानगी जळगाव येथील कारागृहात करण्यात आली होती.
कारागृहात असताना दोन्ही आरोपींनी अँड.नितीन भालेराव यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना आरोपींनी कुठलाही गुन्हा केला नसून पोलिसांना मूळ आरोपी मिळत नसल्याने खोट्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केले आहे तसेच सदर आरोपी यांचा गुन्ह्याशी कुठलाही संबंध नसून गुन्हा घडत्या वेळी आरोपी हे त्यांच्या घरी सी.सी.टी.व्ही. मध्ये दिसत असल्याचे सांगितले होते आरोपी व सरकार पक्षाचे म्हणेने ऐकून जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश राजूरकर साहेबांच्या कोर्टाने दोन्ही आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकिल अँड. नितीन भालेराव यांनी दिली या कामी अँड. जाफर शेख, अँड. मयूर चौधरी, अँड. प्रणय महाजन यांनी मदत केली.