मा. न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलीस कस्टडी व रिमांड, घर झडती दरम्यान सापडली सोन्याची बिस्किटे...
धुळे:- प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दीड लाखाची लाच घेतल्याच्या प्रकरणात धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचेवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम पोलिस हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील यांना देण्यास सांगितले. सदर लाच रक्कमे बाबत तक्रारदार यांनी पोलिस हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून पंचांसमक्ष वरील लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक व दोन हवालदार विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, दत्तात्रय शिंदे व पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांचे विरूध्द सापळा कारवाई होवुन त्यांचे विरूध्द दि.०२.०४.२०२४ रोजी दोंडाईचा पो.स्टे. येथे भ.प्र.अधि. कलम ७.७ (अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यांना अटक करण्यात आली होती.
नमुद आरोपीतांना दिनांक 2 एप्रिल रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना ०२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. दरम्यान आलोसे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राहत्या घराची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घर झडती घेतली असता घर झडती दरम्यान सुमारे ६०,००,०००/- रूपये किमतीची सोन्याची बिस्कीटे व दागीणे तसेच सुमारे ७७,०००/- रूपयाचे चांदीचे भांडी व दागीणे जप्त करण्यात आली असुन त्यांचे कुटुंबाचे व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे १,७५,००,०००/- रूपयाच्या स्थावर मालमत्तेचे खरेदी खताची दस्ताऐवज जप्त करण्यात आले असुन त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास धुळे ला.प्र. विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली खांडवी करीत आहेत.
आलोसे –
1) दत्तात्रय सखाराम शिंदे, पद- पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा, धुळे ( वर्ग- 1) , रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड
2) नितीन आनंदराव मोहने, पद -पो हवा. 334, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, ( वर्ग- 3), रा. प्लॉट नंबर 58, गद माळी सोसायटी, देवपूर, धुळे.
3) अशोक साहेबराव पाटील, वय 45 वर्ष, पद- पो. हवा 1629, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे. ( वर्ग- 3) रा .- प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे
आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. पोलीस महासंचालक सो., महाराष्ट्र राज्य मुंबई.
परिवेक्षण अधिकारी- अभिषेक पाटील
पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.धुळे
मो.न.8888881449
सापळा अधिकारी-
रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
मो.नं. 8379961020.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम, , पो.ना. संतोष पावरा, पो. शि.रामदास बारेला, चालक पो. शि. बडगुजर सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे.
सदर कारवाईस मार्गदर्शन १)श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक, २) माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक, ३) नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक यांचे लाभले.