DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने (पाचोरा)
पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील भोकरी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अरमान अब्दुल कांकर यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने ते अपात्र झाले असल्याने यांनी हेतू पुरस्कर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या वेळी त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यावरही प्रतिज्ञापत्र सादर करतांना माहिती लपवून ठेवत खोटे प्रतिज्ञापत्र सादर करत निवडणुक आयोग व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच तीन पेक्षा जास्त अपत्यांबाबत आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करवा अशी मागणी निवेदनाद्वारे भोकरी येथील अब्दुल रहेमान व अकिल महेमुद शेख यांनी केली आहे.
कारण भोकरी गावचे रहिवासी अरमान अब्दुल कांकर यांनी कायद्याची जाण असतांनाही दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याची माहिती लपवून ठेवत निवडणूक आयोग व शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले तसेच निवडणुकीत साम, दाम, दंड भेद वापरुन निवडणुकीत निवडून येत सरपंचपदी विराजमान झाले होते. परंतु त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने त्यांना मा. जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच अपात्र ठरविले आहे.
असे असले तरीही अपात्र झालेले सरपंच अरमान अब्दुल कांकर हे मी नासिक येथे अपिलात गेलो असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. तसेच अपात्र असल्यावरही ग्रामपंचायतीच्या कामकाजात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप भोकरी येथील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला असून निवडणूक आयोगाकडे खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे अख्तर रहेमान व अकील शेख यांनी म्हटले आहे.
असे असले तरी संबंधितांनी केलेले आरोप व सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज लवकरच अपात्र घोषित करण्यात आलेले सरपंच अरमान अब्दुल कांकर यांची भेट घेऊन सत्यता पडताळून पाहून जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.