DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
पाचोरा:- पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात आज रात्री आठ वाजेच्या सुमारास भोकरी येथील मशिदी जवळ एका ४० वर्षीय इसमाला पाच ते सहा जणांनी रस्त्यावर एकटे गाठून त्यापैकी एकाने सदर इसमावर धारदार शस्त्राने सपासप वार करत इतरांनी जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता भोकरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरुन हा वाद उफाळून आला असल्याचे जनमानसातून सांगितले जात आहे. या घटनेत भोकरी येथील रहिवासी रफिक काकर यांना पाच ते सहा इसमांनी एकटे गाठून जबरदस्त मारहाण केली या पाच ते सहा जणांपैकी एकाने रफिक काकर यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना घडताच भोकरी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले काही ग्रामस्थांनी जखमी रफिक काकार यांना तातडीने पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मा. अमोल पवार साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी भोकरी गावात येऊन घटनास्थळी भेट दिली व सविस्तर माहिती जाणून घेत भोकरी गावातून गल्लीबोळात फिरुन वातावरणाचा आढावा घेऊन भोकरी ग्रामस्थांना काही सुचना देत कुणीही घाबरुन जाण्याचे कारण नसून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, पाचोराचे मा. धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे, उपनिरीक्षक मा. अमोल पवार साहेब व त्यांचे सहकारी करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील भोकरी हे गाव संपूर्ण मुस्लिम बांधवांच्या वस्तीचे गाव आहे. या गावात सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने राहतात परंतु मागील काही महिन्यांपासून भोकरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान असलेले सरपंच अरमान अब्दुल काकर यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत मा. जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करुन विद्यमान सरपंच अरमान अब्दुल काकर यांना पायउतार केले आहे. यानंतर अरमान अब्दुल कांकर यांनी त्यांच्या अपात्रते विरोधात नासिक येथे अपील दाखल केले असून दिनांक ०५ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु अरमान अब्दुल काकर हे या तारखेला हजर राहु न शकल्याने त्यांना २६ एप्रिल तारीख देण्यात आली आहे. असे असतांनाही कायदेशीर लढाई सोडून आज दिनांक ०७ एप्रिल रविवार रोजी रात्री आठ वाजता याच वादातून रस्त्यावर गाठून रफिक काकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.