DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- धुळे जिल्हा वकिल संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.१०/०४/२०२४ रोजी दुपारी २.०० वाजता जिल्हा वकिल संघाच्या हॉल मध्ये अध्यक्ष श्री आर. डी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून धुळे जिल्हा वकिल संघाती निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यात जेष्ठ विधिज्ञ अॅड. आनंद एस. जगदेव यांनी गेल्या ३ निवडणूकांमध्ये अत्यंत पारदर्शक व प्रामाणिकपणे निवडणूक प्रक्रिया हाताळली म्हणून त्यांची पुन्हा सलग चौथ्यांदा सन २०२४ ते २०२६ या कालावधीच्या निवडणूकीसाठी सर्वानुमते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली, तसेच अॅड. मनोज एन देवरे यांनी मागील निवडणूकीत अॅड. जगदेव यांचेसोबत अत्यंत पारदर्शक व प्रामाणिकपणे निवडणूक प्रक्रिया हाताळली म्हणून सर्वानुमते अॅड. मनोज एन. देवरे यांचीही सर्वानुमते सह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत धुळे वकिल संघाचे उपाध्यक्ष अॅड. मधुकर एन. भिसे व अॅड. प्रतिभा माळी मॅडम, सचिव दिनेश गायकवाड, अॅड. सुधा जैन मॅडम, अॅड. पी. एस. महाजन व सर्व कार्यकरिणी सदस्य तसेच धुळे वकिल संघाचे जेष्ठ विधिज्ञ अॅड. एम. एस. पाटील, अॅड. रविदादा देसर्डा, अॅड. एस. आर. पाटील, अॅड. डी. जी. पाटील, अॅड. बी. डी. पाटील, लॉ लायब्ररीचे अध्यक्ष अॅड. जितेंद्र निळे, उपाध्यक्ष अॅड. पी. व्ही. दिक्षीत, सचिव अॅड. गोरक्ष माळी व अॅड. चेतन दिक्षीत, जेष्ठ विधिज्ञ अॅड. आर. एस. सोनवणे, अॅड. श्रीराम देशपांडे, अॅड. बी. बी. बोरसे, जिल्हा सरकारी वकिल अॅड. देवेंद्रसिंह तंवर, अॅड. एस. एन. राजपुत, अॅड. चंद्रकांत जावळे, अॅड. सचिन झेंडे, अॅड. राजेंद्र गुजर, अॅड. एस. व्ही. पेशवे, अॅड. सुनिता शिंदे, अॅड. शोभा खैरनार, अॅड, भारती शिरसाठ, अॅड. उज्वला पेठकर, अॅड. राहुल पाटील, अॅड. राहुल भामरे, अॅड. समीर सोनवणे, अॅड. वाल्मिक कचवे, अॅड. हितेंद्र कबाडे, अॅड. सुरेश बच्छाव, अॅड. महेंद्र जैन, अॅड. एल. पी. ठाकूर, अॅड. संजय शिंपी, वगैरे वकिल वृंद मोठ्या संखेने हजर होते.