DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: साक्री तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. साक्री शहरासह तालुक्यातील शेवाळी (दा.)येथे ईदगाह मैदानात सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. गावासह देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो, अशी दुआ (प्रार्थना)या वेळी करण्यात आली.
रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत गुरुवारी (ता. ११) रमजान ईद साजरी केली. सकाळी ०८:३० सुमारास शेवाळी (दा.) येथील ईदगाह मैदानावर हाफीज वसीम यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाजपठण केले. त्यांच्याकडून खुदबा पठण करण्यात आला.
नमाजानंतर गळाभेट घेताना मनात वैर असेल तर ते काढून टाका. परस्परांतील वाद मिटवून टाका,’ असा संदेश हाफीज वसीम यांनी दिला, शेवटी सर्वानुमते मुस्लिम बांधवांच्या वतीने या पुढे लग्न कार्यात बॅण्ड, डिजे लावू नये व तसे जो कोणी करणार तर त्याच्या कार्यात कोणीच सहभागी होणार नाही असा निर्णय घेण्यात आला. ईदगाह येथे नमाज पठण नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी
परिसरातील मुस्लिम बांधव बच्चेकंपनीसह नवीन पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील माजी पंचायत समिती उपसभापती तथा सरपंच नितीन साळुंके, माजी सरपंच मच्छिंद्र गायकवाड, माजी उपसरपंच तथा सदस्य पंढरीनाथ साळुंके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.