DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – रविंद्र गवळे
नंदुरबार :- शहादा तालुक्यातील कळंबू येथील शेतकरी संजय गवळे हे दिनांक १३ मे सोमवार रोजी शेताचे साहीत्य घेण्यासाठी सारंगखेडा येथे गेले असता सारंगखेडा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कंपाऊंड मध्ये बसलेले असताना त्यांच्या विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कळंबू येथील शेतकरी संजय मोतीराम गवळे (वय ५५) हे दिनांक १३ मे सोमवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता शेतीचे साहित्य घेण्यासाठी सारंगखेडा येथे जावून येतो असे घरी सांगून गेले होते. रात्र झाली तरी वडील घरी परत आले म्हणून मुलगा स्वप्नील गवळे व चुलत भाऊ यांनी गावात तसेच सारंगखेडा येथे शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. दिनांक १४ मे रोजी सकाळी १० वाजता सारंगखेडा गावातील डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या कंपाउंड मध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांना पोलिसांच्या मदतीने सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषीत केले .सदर घटनेची खबर मुलगा स्वप्निल संजय गवळे, वय (२६ ) यांच्या खबरीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास चौकशी अंमलदार ठाणसिग राजपूत करतं आहेत.संजय गवळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन मुली,जावई असा परिवार आहे.