पारोळ्या नजीक दुचाकी घसरून पत्नी व मुलाचा मृत्यू
DPT NEWSNETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- रविंद्र गवळे
नंदुरबार:- शहादा तालुक्यातील कुकावल येथील खाजगी पशुवैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ प्रतीक सुनील सनेर वय 25 व त्यांच्या पत्नी सौ पुनम प्रतिक सनेर वय 22 व त्यांचा दीड वर्षाचा मुलगा अगस्ते प्रतीक् सनेर हे दिनांक 20 एप्रिल रविवारी रोजी कुकावल हून पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे एका मित्राच्या लग्न समारंभासाठी गेले होते. तेथील लग्न आटोपून मंगळवारी प्रतीक सनेर आपल्या पत्नी व मुलासह एरंडोल येथे आपल्या मामाकडे मुक्कामी जात असताना पारोळा एरंडोल रस्त्यावर सांगवी फाट्याजवळ मंगळवारी तीन ते चार वाजे दरम्यान रस्त्याचे सुरू असलेल्या कामामुळे त्यांची दुचाकी घसरून रस्त्यावरील जात असलेले गॅसचे टँकरच्या खाली उजव्या बाजूला पुनम व आगस्ते हे चाकाखाली आल्याने माय लेकाचा जागीच अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला तर प्रतीक उजव्या बाजूला फेकल्या गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रतीक हा खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून परिसरात सुपरीचीत असून तो अत्यंत मितभासी होता. कोवीळ काळात त्याच्या आईचे दुःखद निधन झाले होते या दुःखातून वडील कसेबसे सावरत होते कमी वयात पत्नी गेल्याने घरात पत्नीचा विरह असताना मुलाचा विवाह अडीच वर्षांपूर्वीच मोठ्या थाटामाटात केला होता. प्रतीकला आईची कमी असताना आज त्याच्या अर्धांगिनी ला देखील परमेश्वराने हिरावून नेल्याने सनेर परिवारावर दुहेरी दुःख आल्याने संपूर्ण गावभर शोक कळा पसरली आहे. पारोळा येथे पुनम व अगस्ते सनेर यांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुकावल येथे आणण्यात येणार असून रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.