DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा
साक्री : धुळे खान्देश वारकरी सेवा मंडळातर्फे दि.१४ मे मंगळवारी रोजी स्वामी नारायण सोसायटी मार्केट यार्ड ,धुळे येथील सुंदर व आकर्षक असे श्री प्रसन्न हनुमान मंदिर प्रांगणात खान्देशातील जेष्ठ व श्रेष्ठ वारकरी, किर्तन कार यांच्या उत्तम अध्यात्मिक कार्यातील सेवेचे सन्मान पुर्वक कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा चे भव्य दिव्य असे आयोजन खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या वतीने करण्यात आले होते.यात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील थोर विचारवंत किर्तनकार व उत्तर सेवा करणारे वारकरी आले होते.या प्रांगणात गेल्या सात दिवसांपासून किर्तन सप्ताह सुरू होता.याची आज पुरस्कार सोहळ्याने समाप्ती झाली.यात सव्वाशे च्या पुढे पुरस्कार देण्यात आलेत.
प्रमुख किर्तन कार संत महात्मे यांच्या हस्ते साक्री तालुक्यातील किर्तनकार ह.भ.प.श्री. निंबाजी फुला मोरे, साक्री व ह.भ.प.श्री.ब्ल रामदास दयाराम खैरनार, विटाई येथील यांच्यासमवेत तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करून गौरवण्यात आले.
ज्येष्ठ वारकरी २०२४ पुरस्काराने सन्मानित साक्री तालुक्यातील पुरस्कारार्थी ची नावे खालील प्रमाणे :-
१)ह.भ.प. नवल शंकर शिंदे, राजबाई शेवाळी
२)ह.भ.प. रामदास दयाराम खैरनार, विटाई
३)ह.भ.प. लक्ष्मण पांडुरंग मोरे, आमखेल
४)ह.भ.प. अशोक नारायण कुवर, वासखेडी
५)ह.भ.प.अमृत नामदेव देवरे, ब्राम्हणवेल
६)ह.भ.प. नथ्थु भिल्ला सावंत, देवजीपाडा
७)ह.भ.प.शिवाजी पांडुरंग शिंदे, राजबाई शेवाळी
८)ह.भ.प. निंबाजी फूला मोरे, साक्री
९)ह.भ.प. बाजीराव मोतीराम शेवाळे
१०)ह.भ.प. आत्माराम दशरथ सावंत, तळवाडे भामेर
११)ह.भ.प. भिका म्यानदेव भदाणे, खिरमणी
१२)ह.भ.प. दादाजी भावराव देवरे, म्हसदी
१३)ह.भ.प. धनराज राजाराम नेरे, वसमार
१४)ह.भ.प. प्रकाश दौलत खैरनार, टिटाणे
१५)ह.भ.प. मगन गोकुळ काटके, जैताणे
१६)ह.भ.प. भास्कर बाळा चिंचोले, निजामपूर
१७)ह.भ.प. खंडू लाला अहिरे, बल्हाणे
१८)ह.भ.प. पंडीत बंडू ठाकरे, डोंगडे पिंपळनेर १९)ह.भ.प.शंकर टिला पाटील, दहिवेल
२०)ह.भ.प. लोटन कथ्यू चौधरी, दहिवेल
२१)ह.भ.प. श्रीराम निवा पाटील, शेणपूर
२२) ह.भ.प. शांताराम चिंतामण पवार,
२३)बिलपुरी ह.भ.प. शिवाजी हेमाजी पाटील, बहिराणे
२४)ह.भ.प. चुडामण भिका दाभाडे, बल्हाणे