DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- साक्री शहरातील गौरव सुरेश कापडे (वय २५) व्यवसाय मजूरी रा.श्रीरंग कॉलनी पेरेजपुर रोड ,साक्री भाडणे शिवार ता. साक्री जि.धुळे यानी साक्री पोलीस स्टेशन ला दिलेल्या खबरीनुसार दि.१५ मे बुधवारी रोजी सकाळी कामानिमित्त गावात गेला होता त्यावेळी त्याची आई या एकट्या घरी होत्या काही वेळाने सकाळी ११:३० दरम्यान घरी परतल्यावर तेंव्हा त्याची आई वैशाली सुरेश कापडे (वय ४०) हिने राहत्या घरी खिडकीला दोराने गळफास घेतल्याचे दिसल्याने त्याने लगेच मित्राला फोन करून उपचारासाठी ॲम्बुलन्सने साक्री शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.बोरकर यांनी तपासून दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान वैशाली कापडे हिला मयत घोषित केले घटनेची खबर मयत वैशाली कापडे यांचा मुलगा गौरव सुरेश कापडे यांनी साक्री पोलीस स्टेशन ला दिली असून या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास साक्री पोलीस स्टेशनचे पोहेकॉ बी.एम. रायते करीत आहेत.