शेतकरी वर्ग पुन्हा संकटात तर काकर्दे गावात घरांची पडझड
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- रविंद्र गवळे
नंदुरबार :- वर्षभरात अनेक वेळा अवकाळी गारपीट वादळी पावसाने संकटात सापडलेला शेतकरी सावरत असताना खरिपाची तयारीमध्ये व्यस्त असताना अचानक १७ मे दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान वडाळी,बामखेडा काकर्दासह परिसरातील शेती शिवारातील नवीन लागवड केळी पपई तसेच टरबूज पिकाची वेल तसेच परिपक्व झालेले केळी जमिनीवर आडवी होऊन भूई सपाट झाली परिसरातील अनेक गावातील घरांची पत्रे उडाले रस्त्यावर अनेक झाडे उनमळून पडल्याने शहादा शिरपूर वडाळी जयनगर रस्ता पूर्णतः बंद झाला तर इलेक्ट्रिक तारा खांब ट्रान्सफॉर्मर ऊनमळून पडले त्यामुळे संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला त्याला असून शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात झाल्याने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी मागणी होत आहे.
शहादा तालुक्यातील वडाळी , बामखेडा,तोरखेडा, हिंगणी काकर्दे खुर्द दिगर खैरवे भडगाव परिसरात काल १७ मे सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान सुमारे तासभर चाललेल्या सुसाट वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा अवकाळी वादळी सुसाट वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या केळी बागा तसेच टरबूज पिकांचे वेलही उध्वस्त झाले तर नुकतीच लावणी केलेल्या पपई केळी या रोपांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने काही शेतकऱ्यांचे शेतात ठेवलेले पपई आणि केळीच्या रोपांवर झाड पडल्याने त्याचीही मोठे प्रमाण नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे कधीही न भरून आण नुकसान झाले आहे तर तर वडाळी ,बामखेडासह परिसरातील गावांमध्ये घरावरील पत्रे भिंती तसेच शेती शिवारात सह गावातील इलेक्ट्रिक पोल ट्रांसफार्मर विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला तर परिसरातील अनेक गावात व शेती शिवारात झाडही ऊनमळून पडले त्यामुळे शहादा शिरपूर व वडाळी जयनगर रस्ताही पूर्णतः बंद झाला होता तर त्यात शेती शिवारात खैरवे भडगाव येथील गणेश पाटील सुमारे १५ एकर चा नवती पिल केळीचां बाग पूर्णतः उद्ध्वस्त होत भुई सपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बामखेडा व काकर्दे दिगर येथे घराची पत्रे उडाली
बामखेडा व काकर्दे दिगर येथील अनेक आदिवासी कुटुंबातील घरावरील पत्रे तसेच घराच्या भिंती कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यात
भीमराव जानु भिल ,नानाभाऊ गोरख शिरसाठ,बापू भटू भिल,भिजलाल रावया भिल,छोटू भटु भील ,बामखेडा येथील अमृत नागो सोनवणे, पावभा मालचे यांचे घरांवरील पत्रे उडाल्यामुळे नुकसान झाले आहे.
हिंगणी परिसरात गारांचा पाऊस
हिंगणी परिसरातील शेती शिवारात गारांचा पाऊस पडल्याने नवीनच लावलेले केळी पपई टरबूज या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णतः रडकुंडीस आला.शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.