DPT NEWS NETWORK 🗞️✍️
नंदुरबार :- शाळेच्या पहिला दिवस असलेल्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी वेशभुषा केलेल्या कार्टून ने सर्वांचे लक्ष वेधले… नंतर शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी आपल्या लहान बंधू सोबत नृत्य करत खूप आनंद साजरी केला … त्या नंतर सर्व नवीन तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्या सोबत गावात वाजत गाजत गावातून शोभायात्रा काढण्यात आली.. गावात सर्वत्र पालकाची गर्दी शोभा यात्रा पाहण्यात मग्न झाली होती… यात पालकांसह विद्यार्थांचा आनंद त्यांचा चेहऱ्यावर दिसत होता.. गावातून विविध भागातून शोभायात्रा शाळेत पोहचली नंतर सर्व विद्यार्थ्यांसह पालक बंधू भगिनींनी भोजनाचा आस्वाद घेतला…त्या नन्तर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तु व पुस्तके वाटण्यात आली…कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदे मातरम् शैक्षणिक संकुलचे चेरमन तथा अध्यक्ष श्री.नितीन पाटील सर व मुख्याध्यापिका सौ अर्चना पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले … व सर्व शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी यांनी परिश्रम करून संपूर्ण कार्यक्रम पार पाडला….