DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : दि. २६.०५.२०२४ रोजी रात्रीचे ११.०० वाजेच्या सुमारास पिंपळनेर शहरातील सामोडे चौफुली जवळ नवापुर येथील राहत्या घरी जाण्यासाठी मुलासंह वाहनांची वाट पाहत थांबलेल्या महिलेला दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने सामोडे चौफुली जवळील बैलबाजार येथे घेवुन जावुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर येताच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस यांनी प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता तात्काळ त्याची माहिती वरिष्ठांना कळवुन त्यांचे सुचनाप्रमाणे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एक पथक त्यात पिंपळनेर पोलीस स्टेशन चे पोसई/भुषण शेवाळे, पोहेकॉ/११२६ शाम अहिरे, पोहेकॉ/९७९ कोकणी, पोकों/नरेंद्र परदेशी अशांना लागलीच आरोपीतांचा शोध घेणेकामी रवाना केले.
सदर महिलेने सांगितलेल्या हकिकती प्रमाणे यातील महिला व तिचा मुलगा हे पिंपळनेर शहरातील सामोडे चौफुली येथे गाडीची वाट पाहत थांबलेली असतांना रात्रीचे ११.०० वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन तिचा आरटीओ क्रमांक एमएच १८ बीजी ४६२६ त्यातील काळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक इसम व पिवळा शर्ट घातलेला एक इसम असे दोघे जण त्या ठिकाणी आले. त्यांनी पिडीत महिला हिस सांगितले की, बैलबाजार मैदान येथील शेडमध्ये झोपुन घे, त्यावर महिलेने नकार दिल्याने, ते पिकअप गाडी घेवुन निघुन गेले, व लागलीच पायी-पायी सदर ठिकाणी येवुन यातील पिडीताच्या मुलाला ढकलुन देवुन पिडीत महिला हिस बळजबरीने ओढुन घेवुन जावुन तिच्या वर दोघा इसमांनी आळीपाळीने लैगिंक अत्याचार केले व तेथुन आपल्या पिकअप वाहनाने पळुन गेले. त्यांनतर पोलीस पथकाने सदर पिकअप वाहनाचा शोध घेतला असता ते घोड्यामाळ येथील निलेश सतिष निकम यांचे असल्याचे माहिती मिळाली त्यावरुन त्यास ताब्यात घेतले व त्यास अधिक विचारपुस करता त्याचा मित्र स्वप्नील शिवाजी वाघ हा देखील त्याच्यासोबतच असल्याची त्याने कबुली दिली दोघे आरोपीतांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला फिर्यादी यांचे समक्ष आणले असता, फिर्यादी यांनी आरोपीताना खात्रीशीर ओळखल्याने पिंपळनेर पोलीस स्टेशन गुरंन १५७/२०२४ अन्वये दोन्ही आरोपीतावर अनु. जाती. व अनु. जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनिय १९८९ चे कलम ३ (१) फ प्रमाणे तसेच भादवि कलम ३७६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री विभाग श्री साजन सोनवणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री.श्रीकांत धिवरे , अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस, पोसई/भुषण शेवाळे, पोहेका/११२६ शाम अहिरे, पोहेका ९७९ कोकणी, पोहेका ६३१ कांतीलाल अहिरे, पोकों/ नरेंद्र परदेशी, पोकों/विजय पाटील, पोकों/पंकज वाघ यांनी केली आहे.