DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन
जळगांव :- एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथे मोटर सायकल ला ट्रॅक्टर चार धक्का लागल्याने झालेल्या वादातून एकास नऊ जणांनी मारहाण केल्याची घटना घडली असून पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
या बाबत पोलीस सूत्रां कडून मिळालेले माहिती अशी की , दि. २६ में २०२४ रोजी अडीच वाजेच्या सुमारास विशाल काशिनाथ धनगर याने आपल्या घरासमोर स्वतःची मोटरसायकल लावली असता त्यास नंदलाल बापू महाजन यांनी त्यांच्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पुनर्वसन होत नंदलाल महाजन, अरुण महाजन, गणेश महाजन, सुरेश महाजन, हिरालाल महाजन, शरद महाजन सुभाष महाजन, रवींद्र महाजन, पन्नालाल महाजन सर्व राहणार खर्ची यांनी तक्रारदार विलास धनगर यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिनाथ पाटील हे करीत आहे.