DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- कॉपर केबल विक्रीचे अमेझ दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना निजामपूर पोलिसांनी 24 तासाच्या आत केले गजाआड, तक्रारदार हरिष सुजेश पवार, वय-५६ वर्षे व्यवसाय इंजिनीयरींग वर्कशॉप रा. एन.३०, रॉ हाऊस ०४, सेक्टर ०७, मुंबई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार इक्बाल चव्हाण रा. जामदा ता. साक्री जि. धुळे व अमित नाईक रा. नवी मुंबई यांनी फिर्यादीस विश्वासात घेवुन त्यांना ४४ टन कॉपर केबलचे देण्याचे अमिष दाखवुन त्यांना साक्री तालुक्यातील पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनीजवळ कॉपर केबल खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलविले होते. त्यानुसार दि.२९/०५/२०२४ रोजी तक्रारदार हरिष पवार तसेच त्यांचे सोबत सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर व त्यांचे बॉडीगार्ड नितीन मोरे, हुकुमसिंग, प्रकाशसिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा हे त्यांच्या दोन चारचाकी वाहनाने पेटले गाव शिवारातील सुझलोन कंपनीजवळ आले असता सुझलॉन कंपनीच्या गेटवर इक्बाल चव्हाण, अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश येंकी पवार, राजेश शंकीलाल पवार व त्यांचे सोबत इतर दोन ते तीन इसम असे हजर होते. त्यांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्या ताब्यातुन २२,०३,०००/- रोख रक्कम व २,५५,०००/- रु किमतीचे सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, घड्याळ, एटीएम कार्ड, असे एकुण २४,५८,०००/- रुपयांचा किमतीचा मुददेमाल त्यांना मारहाण दमदाटी करुन बळजबरीने लुटुन नेला. म्हणुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे तक्रारदार हरीष पवार यांच्या तक्रारीवरुन निजामपुर पोलीस ठाणे गुरनं १५२/२०२४ भादवि कलम ३९५, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयातील आरोपी नामे ०१) अमीत तानाजी नाईक रा. ऐरोली, नवी मुंबई ०२) अनुप ऊर्फ राज मुन्नालाल शर्मा रा. उमीयानगर सुरत ०३) ज्ञानेश्वर धर्मा पाटील रा. आर्थे ता. शिरपुर यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन त्यांचे कडुन लुटुन नेलल्या मुद्देमालापैकी १३,५०,०००/- रोख रक्कम व ०४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत तसेच इतर आरोपीतांचा शोध चालु आहे.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. साजन सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, सपोनि / श्रीकृष्ण पारधी, स्थागुशा, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/हनुमंत गायकवाड, असई/शेख, पोहेकॉ/१२५४ मालचे, पोना/१३६१ आखाडे, पोकों/२८४ अहिरे, पोकॉ/१४९५ चव्हाण, पोकॉ/१२५३ शिंदे, चाअसई/पवार यांचे पथकाने केली आहे.