DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
चाकण : खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या खालूम्ब्रे गावात गुरुवार(दि.०६) रोजी एका मागासवर्गीय सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४७ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे.
अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर दादा दत्तू भोसले(वय-४७ वर्षे)रा. खालूम्ब्रे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. चिकमहुद, ता. सांगोला, जि. सोलापूर या नराधमाने भर दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान हिस जवळ घेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही गंभीर किसळवाणी घटनासमोर आल्यानंतर आरोपीला स्थानिक ग्रामस्थांनी चोप देऊन त्यास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
सध्या चाकण औद्योगिक वसाहतीतील अशा चुकीच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. त्यातच असे बिनकामाचे दिवटे नशेच्या आहारी जाऊन असे दूरकृत्य करत आहेत. अशा नराधमांवर शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस चालवून अशा चिमुकल्यांना लवकर न्याय कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. त्याच बरोबर पालकांनीही लहान मुलांना एकटे घरात न ठेवता कुणा सजक किवा जबाबदार घरातील व्यक्तीवर मुले सांभाळण्याची जबाबदारी द्यायला हवी. नाहीतर जन्माला घातलेल्या चिमुकल्या बरोबर असे घात झाल्याशिवाय राहणार नाहीत. या घटनेमुळे परिसरातुन आरोपीला कडक अशी शिक्षा होण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आरोपीवर महाळुंगे पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२)(जे) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून सरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४ सह विविध कलमाच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वाती लामखडे या करीत आहेत.
प्रतिक्रिया :-
खालूम्ब्रे गावात जी निंदनीय घटना घडली त्या घटनेतील आरोपीला कडक अशी शिक्षा व्हायला हवी. त्या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी शासनाने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करून आरोपीला कडक अशी शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
-सौ. धनश्री बुचुटे, सामाजिक कार्यकर्त्या