नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपळनेर पोलिसांनी २१ गोवंश निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोंघाना घेतले ताब्यात; ७ लाख ६१ हजार रूपयांचा मुद्देमाल केला जप्त.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री:-  पिंपळनेर पोलीस स्टेशन चे पोशि/१०७३ दावल रामचंद्र सैदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,
दि.०४.०६.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास ते आणी पोसई विजय चौरे, पोशि/१३९४ रविंद्र सुर्यवंशी, पोशि/१४१९ नरेंद्र माळी असे लोकसभा निवडणुक मतमोजणीच्या अनुषंगाने पिपंळनेर ता. साक्री जि.धुळे गावात तसेच परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पिंपळनेर पोलीस स्टेशन चे सपोनि सचिन कापडणीस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती कि, नवापुर कडुन पिपंळनेर कडेस टाटा कंपनीची क्र.एम.एच.१६ सी.डी.८९३१ हिच्या गोवंश जातीचे गायी हया कत्तलीसाठी भरुन घेवुन जात आहेत बाबत माहिती मिळाल्याने सपोनि/कापडणीस यांनी त्यांना तसेच पोसई/विजय चौरे,,पोशि/रविंद्र सुर्यवंशी, पोशि/१४१९ नरेंद्र माळी अश्यांना योग्य ती कार्यवाही करणेबाबत कळविल्याने पोसई विजय चौरे यांनी दोन इसमांना पोस्टेला बोलावुन त्यांना हकिकत सांगुन त्यांना पंच म्हणुन हजर राहणेस विंनती करुन ते पंच म्हणुन सोबत येण्यास तयार झाल्याने पोलीस ठाण्यातुन सरकारी वाहन क्रं.एम.एच.१८ बी.आर.५४१६ हिच्यात वरील पोलीस स्टाफ व पंच असे पंचानामा कामी लागणारे साहित्यसह पिपंळनेर पोलीस स्टेशन येथून निघून नवापुर रोडने हॉटेल मराठा दरबार जवळ थांबून रोडाचे खाली उतरुन थोडया वेळात नवापुर कडुन येणारी लाल रंगाची टाटा कंपनीची टर्बो मॉडेल असलेली वाहन क्रं.एम.एच.१६ सी.डी.८९३१ ही समोरुन येतांना दिसली असता तिला त्यांनी हाताने थांबण्याचा इशारा केला त्यावेळी वाहन हे हॉटेल मराठा दरबार जवळ रोडाचे साईडने उभे करुन त्यावरील चालकास काय माल भरला आहे असे विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यास पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रजापती ईश्वरभाई अमृतभाई वय. ४२, व्यवसाय चालक, रा. मेथान, ता.जि.पाटण (गुजरात राज्य) व त्याचे सोबत असलेला दुसरा इसम त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अर्जुनजी ओखाजी ठाकुर वय. ३०, व्यवसाय वाहन क्लिनर, रा. मेथान, ता. जि.पाटण (गुजरात राज्य) असे सांगितले असता सदर वाहनाचा मागिल दरवाजा उघडुन पाहिले असता त्यात ७ लाख ६१ हजार किमतीचे गोवंश जातीचे गायी व बछडे आखूड दोरीने निर्दयतेने बांधून दाटीवाटीने ठेवून त्यांना वेदना व यातना होतील  अशा स्थितीत निर्दयतेने कत्तलीसाठी घेवून जात असतांना मिळून आल्याने वाहन चालक प्रजापती ईश्वरभाई अमृतभाई व त्याचा साथीदार अर्जुनजी ओखाजी ठाकुर या दोंघा विरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशनला भारतीय प्राण्यांना वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (च) (ड) सह महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम १९९५ चे कलम ५(अ), (ब) व ९ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ माळचे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:47 am, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!