DPT NEWS NETWORK 🗞️✍️
अकोला :- एस फोर सोल्युशन्स ही प्रकाशन संस्था मराठी साहित्याच्या क्षेत्रात दिलेल्या विशिष्ट योगदानाबद्दल आणि किमान एक किंवा अधिक पुस्तक लिहून प्रकाशित केलेल्या सर्वोत्तम प्रकाशन सेवा पुरवणाऱ्या एस फोर सोल्युशन्स या भारतातील अग्रगण्य प्रकाशन संस्थेकडून 2024 चा साहित्यरत्न पुरस्कार मिलिंद इंगळे यांना प्रदान करण्यात आला आहे.
या वर्षीचा हा दुसरा पुरस्कार असून सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मिलिंद इंगळे यांना नुकताच पुणे येथे दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेअभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
आता भारतातील अग्रगण्य व साहित्य प्रकाशनात अग्रेसर असणारी एस फोर सोल्युशन्स या संस्थेमार्फत मिलिंद इंगळे यांच्या “तिच्या उदरी तिच्या पदरी” या काव्यसंग्रह लिखाणाबद्दल साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
मिलिंद इंगळे यांना कालच पार्सल व्दारे घरपोच हा पुरस्कार मिळाला. मिलिंद इंगळे यांचे साहित्य क्षेत्रात भरीव योगदान आहे. मिलिंद इंगळे यांनी अनेक पुस्तकांना मुखपृष्ठ व रेखाटणे दिले आहेत. त्यांचे साहित्य अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिक, विशेषांकामध्ये प्रकाशित झाले आहेत. नुकताच त्यांनी लिहिलेले पैंजण हे गीत युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
मिलिंद इंगळे हे कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुर्तिजापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्या माध्यमातून यशस्वीरित्या दोन राज्यस्तरीय कला व साहित्य संमेलन पार पाडले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते महाराष्ट्र भर झाले आहेत. त्यामुळे चाहते वर्षभर मिलिंद इंगळे यांच्या संपर्कात राहतात.
ही त्यांची खरी संपत्ती आहे असे ते मनोगतात व्यक्त होत राहतात.