DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी निवास गागडे इचलकरंजी इचलकरंजी येथील श्रुती अभिषेक नवले रा. गोकुळ हौसिंग सोसायटी चिकली पुणे याचा विवाह गेली तीन वर्षे पूर्वी अभिषेक याच्याशी हिंदू धर्म रितीरीवजाने करण्यात आला होता.लग्नामध्ये १ ग्रॅम सोन्याच्या ३ नथि, २ तोळंयाच्या सोन्याच्या बांगड्या , अर्ध्या तोळ्यांची सोन्याची अंगठी , चांदीचे पैंजण व जोडवे असे दागिणे आई वडीलानी लग्नात श्रुतीला घातले होते . लग्नाच्या १५ दिवसातच मानपान व देविघेवाणाच्या कारणाने व आई वडील यांनी दिलेले दागिने काढून घेऊन नंदन टिना अजय माछरे , नंदवा अजय विक्रम माछरे पती अभिषेक , सासू बबिता दत्तू नवले यांनी श्रुती नवले हिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास चालू केला. पती अभिषेक पासून मुलबाळ होत नसलेने ते मला माहेरून दवाखान्याच्या उपचाराकरिता २ लाख रुपये घेऊन येण्यास पती व सासू याने तगादा लावला. त्यानंतर भाऊ आकाश गागडे याने एक दोनदा ४० हजार रुपये बहिणीला त्रास होऊ नये यासाठी दिले. त्यानंतर ही वारंवार पैसे मागत असताना भाऊ याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी पती व सासू हे श्रुतीला उपाशी पोटी प्रकार चालू केला आणि घरातून हाकलून देण्याची धमकी देत होते. रोजच्या पती सासूच्या त्रासाला कंटाळून श्रुती हिने आत्महत्या करण्यास प्रयत्न केला. श्रृतीला वाय. सी. एम. हॉस्पिटलमधे उपचारासाठी सोडून देऊन पती अभिषेक पळून गेला. सततच्या जाचाला कंटाळून श्रुती अभिषेक नवले हिने पती अभिषेक दत्तू नवले , सासू बबिता दत्तू नवले , नणंद टिना अजय माछरे व नंदवा अजय विक्रम माछरे यांच्या विरोधात पुणे येथील येरवडा पोलिस ठाणे मध्ये फिर्याद दिली. फिर्यादी प्रमाणे पती. सासू. व इतरांच्यावर येरवडा पोलिसांनी कलम ४९८ ( अ ) , ४०६ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.