DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- घरी एकटीच असल्याची संधी साधत विवाहित महिलेशी (40) लगट करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदर घटना आज दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास येथील दिघोरा वस्तीत घडली.
कर्मवीर राजन कलसे 31 रा. स्वीपर कॉलनी भिवापूर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारिवरून त्याच्या विरुद्ध कलम 76, 115(2), 332(सी), 351(2) अन्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ती दुपारी घरी भांडे घासत असतांना आरोपीने कुंपणावरून उडी घेत तिच्या घरात प्रवेश केला. येण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान पीडिता घाबरून घरातील किचन रूम मध्ये गेली असता आरोपी तिच्या मागे केला. तीला काही कळायच्या आतच त्याने तीला मागून उचलून बाजूच्या बेडरूममध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तीने तीव्र प्रतिकार करीत त्याच्या चेहऱ्यावर नखाणे ओरबाडले व मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने पळ काढला. जाता जाता कुणाकडे वाच्यता केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.
घडलेल्या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने कामावर गेलेल्या पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. पती पत्नीने लगेच पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. ठाणेदार जयकिशोर निर्मल यांनी तातडीने हालचाली करीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला बाजार समिती परिसरामधून अटक केली. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक महागावे करीत आहेत. वरील घटनेमुळे दिघोरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.