माजी आमदाराचा विद्यार्थ्यांसोबत बस प्रवास!
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी सुनील मैदिले
उमरेड : माजी आ. राजू पारवे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर तालुक्यातील मांगली खापरी गावात लालपरी धावली. या मुळे विद्यार्थी व प्रवाशांमध्ये आनंदाला उधाण आले. दरम्यान राजू पारवे यांनी बसच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत त्यांच्याशी संवाद साधला.
काही तांत्रिक अडचणींमुळे उमरेड तालुक्यातील मांगली खापरी येथे अद्यापही बस सेवा नव्हती. परिणामी विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत होते. विद्यार्थांना तर तीन किलोमीटर, कोणाला सहा किलो मिटर अंतर सायकल किंवा पायदळ जावे लागत होते. विद्यार्थी व प्रवाशांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आ. राजू पारवे एस.टी. महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सोमवारी (दि.२९) नागपूर मांगली खापरी बस धावली. गावात प्रथमच लालपरी आल्याने महिला भगिनींनी राजू पारवे यांचे औक्षण करत स्वागत केले. बससेवा सुरू झाल्याने मांगली येथील विद्यार्थी व प्रवाशांना चांपा, उमरेड, नागपूर इथे प्रवासाची सोय झाली आहे. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान बसच्या पहिल्या फेरीत माजी आ. राजू पारवे यांनी तिकीट काढून मांगली ते विजय विद्यालय असा विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत हितगुज साधले. फार मोठी समस्या सोडवल्याने विद्यार्थ्यांनी राजू पारवे यांचे आभार मानले. लालपरीच्या स्वागतावेळी सरपंच मंजुषा टोंगे, उपसरपंच हिरामण अंबाडारे, सदस्य पुष्पा लाड, छोटू मोटघरे, अर्चना भुरे, साधना कुरुडकर, महेश धाबेकर, नरेंद्र वाढई, वामन वाढई, टिपू शेख, ऋषिकेश पवनकर, अमीर शेख, महानंदा शेवारे, चंदा वानखेडे, वंदना पवणकर, सचिन बकाल, विलास गेडाम, गणेश बकाल, शंकर चौधरी यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.