DPT NEWS NETWORK 🗞️✍️
भिवापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या भिवापूर तालुका अध्यक्षपदी चंद्रशेखर समर्थ तर शहर अध्यक्षपदी सुनील मैदिले यांची आज नियुक्ती करण्यात आली.
बजाजनगर परिसरातील पक्ष कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांनी समर्थ व मैदिले यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी नागपूर शहरअध्यक्ष प्रशांत पवार, उमरेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पुंडलिक राऊत, रायुकाँ जिल्हा अध्यक्ष सचिन चव्हाण, रवी वैद्य, कपिल नारणवरे, मनोज कुमरे, मिलींद मौदेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी रमेश इवनाते यांची उमरेड तालुका अध्यक्षपदी निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.