DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- मेडिकल स्टोर, मोबाईल शॉपी व गॅस एजन्सीच्या शटरचे कुलूप तोडून नगदी व सामानासह पसार झालेल्या चोरट्यास पोलिसांनी 25 दिवसानंतर मोठ्या शीताफिने अटक केली.
सुनील श्रीकृष्ण घरत 28 रा. पिराया ता. भिवापूर असे चोरट्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. गत 5 जुलैच्या मध्यरात्री त्याने येथील भीमादेवी मंदिर मार्गावर असलेले मेडिकल स्टोर, मोबाईल शॉपी व गॅस एजेंसी कार्यालयाच्या शटरचे कुलूप तोडले होते. यात मेडिकल स्टोर मधून रोख 1500 रुपये व मोबाईल शॉपी मधून 13 मोबाईल त्याने चोरून नेले होते. गॅस एजेंन्सी कार्यालयात मात्र त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. दरम्यान मेडिकल स्टोरमध्ये लागलेल्या सीसी टीव्हीत चोरट्याचा चेहरा कैद झाला होता. त्यावरून पोलिसांना त्याची ओळख पटून तो सुनील घरत असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते.
सदर चोरटा पिराया परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याकडून मंगळवारी दुपारी पोलिसांना मिळाली. त्या आधारावर डीबी पथकाने सापळा रचून मोठ्या शीतफिने त्याला अटक केली. चोरी केलेली रक्कम खर्च केल्याचे तर मोबाईल नागपूरमध्ये विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आरोपी हा सराईत चोर असून यापूर्वी उमरेड व भिवापूर परिसरात चोरीचे काही गुन्हे त्याच्यावर नोंदविले आहेत. ठाणेदार जयकिशोर निर्मल यांच्या मार्गदर्शनात हे. काँ. आनंद धात्रक पुढील तपास करीत आहे.