DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपूर :- महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर व शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी नुकतीच मुंबई येथे भेट घेवून त्यांच्या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयी चर्चा केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नागपूर शहर आणी जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी तटकरे यांनी काही सूचना केल्यात. तसेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर व जिल्ह्यात शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी कौतुक केले. पक्षसंघटना बळकट करण्यासंदर्भातही यावेळी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आल्याचे समजते.