DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे
:- शहरांमध्ये दिनांक 4 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री रणजीत राजे भोसले यांच्यामार्फत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रातील तरुण पिढी बेरोजगारीच्या आगीत होरपळली जात असताना, चांगले शिक्षण असूनही नोकरी उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती युवकासमोर आहे. "रोजगार व युवा विकास" हेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे धोरण राहिले असून साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मेळाव्यामध्ये थेट मुलाखती घेऊन निवड झालेल्या तरुणांना लगेच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. मेळावा मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, फायनान्स, फार्मा, आयटी, रिटेल, सेल्स, मार्केटिंग, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटलिती,फॅसिलिटी, टेलीकॉम, सेक्युरिटी, ॲग्री, मॅन पावर सप्लाय आदी क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी,पदविका, पदवी पर्यंतच्या तरुणांनी सोबत बायोडाटा व आवश्यक ती कागदपत्रे आणावी. रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवन, स्टेशन रोड,धुळे येथे मेळावाचे आयोजन करण्यात आलेले असून या मेळावाचे उद्घाटन धुळ्याच्या खासदार सौ शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश आण्णा पाटील हे असून धुळे ग्रामीणचे आमदार श्री कुणालजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख नेते तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून धुळे शहर व जिल्ह्यातील युवकांना पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बेंगलोर या शहरातील 50 नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. तब्बल 3000 तरुणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट असून जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान रणजीत राजे भोसले, सर्व सेल प्रमुख, आघाडी प्रमुख, ज्येष्ठ, कार्यकारणी सदस्य, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.