ग्रामसेवकांच्या आंदोलनाचे फलित
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदिले
नागपूर :- ग्रामपंचायत सचिवावर हल्ला करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यावर जलालखेडा पोलिसांनी अखेर गुन्हा नोंदवीला. या कारवाईबाबत समाधान व्यक्त करीत सुरु केलेले कामबंद आंदोलन ग्रामसेवक संघटनेने सोमवारी मागे घेतले.
गत 21 ऑगस्टला जलालखेडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गोरे यांच्यावर सफाई कर्मचारी असलेल्या महिलेने शुल्लक कारणावरून हल्ला केला होता. गोरे यांनी घटनेची तक्रार नोंदविल्यानंतरही पोलीस कारवाईस टाळाटाळ करीत होती. त्यामुळे संतप्त ग्रामसेवक संघटनेने घटनेचा निषेध नोंदवून पोलीस कारवाई नाही केली गेल्यास 26 ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार 26 ऑगस्टला जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीतील ग्रामसेवकांनी आंदोलन केले. आंदोलनाचा कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला. ग्रामसेवकांच्या एकजुटीचा पोलीस प्रशासनाने धसका घेत आरोपी महिलेविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलले. तिच्या विरुद्ध सोमवारी (दी. 26) कलम 121(1),132,351(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईबाबत समाधान व्यक्त करुन ग्रामसेवक संघटनेने सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. ग्रामसेवक एकजुटीचे हे फलीत असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. आरोपीविरुद्धच्या कारवाईकरिता जी.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपमुख्य कार्यकरी अधिकारी(पंचायत ) कपिलनाथ कलोडे, नरखेडचे गटविकास अधिकारी डॉ निलेश वानखेडे यांचे ग्रामसेवक संघटनेचे राज्य मानद सचिव सुभाष धारपुरे, जिल्हाध्यक्ष विष्णू पोटभरे जिल्हासरचिटणीस उदय चांदुरकर, कार्याध्यक्ष किशोर अलोणे, उपाध्यक्ष सुनील इचे, महिला उपाध्यक्ष सुनीता पाटील (पंचभाई ), कोषाध्यक्ष सचिन खोडे, सहसचिव गजानन शेंबेकर, प्रसिद्धीप्रमुख विनोद गोखे आदी पदाधिकाऱ्यांनी आभार मानलेत.