सविस्कर वृत्त असे की – मागील 4 वर्षा पासुन निरंतर 12 ही महीने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार व गरजु बाँधवांचे वाढत्या ठंडी पासुन अल्पशः रक्षण करण्यासाठी चादर वाटप करण्याची सेवाभावी मोहिम
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष रामचंद्र येशी सचिव हेमलता येशी खजीनदार कुलदीप राजपूत यांच्या माध्यमातून राबवली जाते
त्याच प्रकारे यंदा ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर ठंडी चे वातावरण असल्याने शिरपुर शहरातील 12 ही महीने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या व झोपणाऱ्या 55 निराधार,गरजु बाँधवांना जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून वाढत्या ठंडी पासुन अल्पशः रक्षण करण्यासाठी चादर वाटप करण्यात आली
सदर सेवाभावी मोहिमेत शिरपुर येथील दिसान टेक्सटाइल पार्क चे ऐ. जी.एम शरद फुलपगारे, मुंबई येथील आनंद वधुवर सूचक मंडळ चे अध्यक्ष तुकाराम झिपा सोनवणे,धुळे येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे धुळे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख विशाल चित्ते यांचे आर्थिक स्वरूपाचे अप्रतिम सहकार्य लाभले
तसेच यशवंत निकवाड़े सर,भरत येशी,दिलीप येशी सुधाकर वारुळे,रमेश चौधरी ,रामचंद्र पवार,संभाजी बोरसे,सी.के.महाले,गणेश येशी,गोकुळ येशी यांच्या उपस्थितीत जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन व उपाध्यक्ष रामचंद्र येशी यांच्या माध्यमातून चादर वाटप करण्यात आली
त्या वेळी सर्वच दानशूर मंडळी यांचे विकास सेन यांनी आभार मानले व अश्याच प्रकारे सदैव निराधार ,गरजु लोकांच्या सेवेसाठी आर्थिक व वस्तु रुपात मदत करण्यासाठी विकास सेन यांनी जनतेला आवाहन देखील केले.