(क्राईम रिपोर्टर – मनोहर पाटील)
दि.28/01/2022 धुळे:- मध्यप्रदेशातून नंदुरबार मार्गे धुळे येथे अवैधरित्या विदेशी बनावटीचे मद्य घेऊन जाणारा ट्रक, आज सकाळी 5 वाजेला धुळे तालुका पोलिसांनी मुकटी शिवारात एका हॉटेल समोर कारवाई करीत पकडला,या ट्रक मधून 32 लाखाचा विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे, तसेच ट्रक आणि एक स्कार्पिओ सुद्धा पकडली असून एकूण 50 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, याबाबत आज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 28 रोजी धुळे तालुका पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील खलघाट येथून विदेशी दारूचा साठा घेऊन ट्रक नवापूर जि, नंदुरबार येथे चोरटी वाहतूक करीत निघाला आहे, त्या माहितीच्या आधारे सकाळी 5 वाजेला धुळे तालुका पोलिसांनी मुकटी शिवारातील हॉटेल करणी येथे सदर ट्रक पकडला, त्यावरील वाहन चालक पप्पूसिंग रघुनाथसिंग दोडिया (वय 35) रा. उनी ता. जावरा जि. रतलाम, मध्यप्रदेश हा मिळून आला,या ट्रकमध्ये ऑल सिझन्स कंपनीच्या विदेशी दारूचे एकूण 255 बॉक्स मिळून आले, तसेच ट्रकची वाहतूक करण्यासाठी साहाय्य करणारे स्कार्पियो वाहन क्र. GJ 06 CF 2133 हे व त्यावरील तौसीमोद्दीन रशीदभाई शेख, उमेश दुर्गादास वसावा दोघे रा. नवापूर यांना सुद्धा पकडण्यात आले, या कारवाईत 32 लाख 74 हजाराची विदेशी दारू, 10 लाखाचा ट्रक, 8 लाखाचा स्कार्पिओ वाहन असा एकूण 50 लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,
महाराष्ट्रात बंद असलेली ही विदेशी दारू मध्यप्रदेशातून नवापूर येथे पिंटू उर्फ गोरख भीमराव गढरी याच्याकडे अवैध विक्रीसाठी वाहतूक करून घेऊन जात होते, याप्रकरणी 6 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई पोलीस अधिक्षक प्रवीण पाटील,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी साक्री प्रदीप मैराळे, यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. हेमंत पाटील, सपोनि. भूषण कोते, उपनिरीक्षक सागर काळे, हे.कॉ. प्रवीण पाटील, सोमनाथ कांबळे, पोना. योगेश पाटील, पो. कॉ. कुणाल शिंगाने, पो.कॉ. धिरज सांगळे, पो.कॉ. भूषण पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील, चालक पोना प्रकाश भावसार यांनी केली.