मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- संजय जाधव
नाशिक:- निफाड येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त निफाड शहरात मिरवणूक काढण्याचे आयोजित करण्यात आले होते परंतु सदर मार्ग हा गणपती विसर्जनाचा असल्याने सामाजिक बांधिलकी जपत, गावाचा एकोपा, बंधुभाव टिकून राहावा या उदात्त हेतूने ईद निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक मुस्लिम समाजाच्या पंच कमिटीने रद्द केलेली आहे.
निफाड पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे नुकतेच आयोजन निफाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते, याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आला असून ईद निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली असून मशिदीजवळ झेंडे पताका व स्टेज न लावण्याचा निर्णय मुस्लिम समाज पंच कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे, एकमेकांच्या धर्माचा आदर करत मुस्लिम बांधवांनी दाखविलेले ऐक्याचे दर्शन कौतुकास्पद असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
याप्रसंगी मुस्लिम पंच कमिटीचे असिफ पठाण, तनवीर राजे, नगरसेवक जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते वकील भाई शेख ,शेफिक पठाण, शेरखान मुलांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफान पठाण, अमजद शेख, पप्पू शेख, नावेद मणियार, हाजी अली पठाण, आदी उपस्थित होते.