DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी संजय जाधव
निफाड:- कर्म हिच पुजा समजून वृध्दापकाळात हि न थकता आळसाला बाजूला सारून उन,वारा, पाऊस,यांची तमा न बाळगता वाचकप्रिय ग्राहकांना ताज्या बातम्यांचा खजिना दैनिकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन वाटप करणारे , तरुणांना लाजवेल असा कर्मयोगी.निफाड पंचक्रोशीत सुपरीचित असनारे नाव कोष्टी बाबा उर्फ मधुकर मरडे यांच्या कामाची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे
निफाड शहर व परिसरात गेली अनेक वर्षे अव्याहतपणे पहाटे पासुन आपल्या सायकलवर तर कधी पायी प्रवास करून पेपर वाटण्याचे काम करणारे कोष्टी बाबा . वृध्दापकाळात हि रोज पेपर वाटतात, चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली तर त्या व्यक्तीला काम करण्यास आणखी बळ मिळते,या उदात्त हेतूने निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी १५ऑगष्ट रोजी कोष्टी बाबांचा शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, व समाजा समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे या वेळी पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, ईश्वर पाटील, विश्वनाथ निकम, राजेंद्र बाविस्कर, पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले,राजु मनोहर, नितीन सांगळे, राजेंद्र दरोडे,भारत पवार, सुनील सानप, आदी उपस्थित होते ,