DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ दर्शन पोलीस टाईम
धुळे :- आर.सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर समस्येवर व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबरच्या अनुषंगाने येणा-या विविध समस्यांचे निराकरण केले. विद्यार्थ्यांना हल्ली चाललेल्या डिजीटल अरेस्ट फ्रॉड बद्दल त्यांनी माहिती दिली व सांगितले की, कोणताही पोलिस अधिकारी आपणास डिजीटल अरेस्ट म्हणजेच ऑनलाईन अटक करु शकत नाही. तसेच डिजीटल अरेस्ट बाबत लोकांनी जास्त पॅनिक होवू नये कारण हे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरीकांना डिजीटल अरेस्टची भिती दाखवून त्यांची आर्थिक फसवणुक करतात व विदयार्थ्यांना पार्सल फ्रॉड व तुमच्या पार्सल मध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहेत या सारख्या विविध फ्रॉड पासून सावध कसे राहावे याविषयी अॅड. चैतन्य भंडारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
महाविदलयातील विद्यार्थीनी वर्ग व मुली यांनी हिडन कॅमेरा पासून सावधान कसे रहावे याबाबत देखील त्यांनी याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सायबर सायकोलॉजी मध्ये सकारात्मक बदल करणे याबाबत तसेच जे काही विद्यार्थी सायबर ऑनलाईन छळवणुक, ऑनलाईन बुलिंग, हिडन कॅमेरा याला बळी पडले असतील, ऑनलाईनच्या समस्यांमुळे डिप्रेशन मध्ये गेले असतील त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. यावेळी ऑनलाईन जॉबच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी अॅड. चैतन्य भंडारी यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा करुन त्यांना या विषयी येणा-या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमा प्रसंगी कॉलेजचे डायरेक्टर डॉ. जयंतराव पाटील, सौ. अमृता भंडारी, उपप्राचार्य पी. जे. देसले, व्ही. एस. बावीस्कर, एम. एस. सोनवणे, व्ही. आर. विसपुते प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच कॉलेजमधील विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.