DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे
कोल्हापूर:- अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने असून रायगड जिल्ह्यातील शाखा अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन न्यू इंग्लिश स्कुल नेवरूळ या ठिकाणी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिनानिमित्त प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रम घेण्यात येतो.
संस्थेने सामाजिक शैक्षणिक,कला, क्रीडा, वैद्यकीय, संस्कृतीक क्षेत्रात गेली 18 वर्षे सतत कार्यरत राहीली असून संस्थेने इचलकरंजी शहरातील उमेश सुरेश मिणेकर यांना सध्या न्यू इंग्लिश स्कुल येथे शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. उमेश मिणेकर यांना 5 सप्टेंबर 2024 ह्या शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात देत असलेल्या सेवेसाठी व विशेष योगदानबद्दल, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची विशेष नोंद घेऊन संस्थेच्या वतीने श्री.उमेश सुरेश मिणेकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेस संस्थेचे संस्थापक संजय पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व स्टाफ उपस्थित होते.