DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – संदीप सकट
कोल्हापूर:- चंदगड तालुक्यातील कोदाळी. पाटणे फाटा ते बेळगांव अशी सकाळच्या वेळीच्या बसव्यतिरिक्त पाटणे फाटा ते तिलारी नगर व तिलारी नगर ते पाटणे फाटा अशी इतर कोणतीही एसटी बस सुरू नसल्याची बातमी दै.तरुण भारत कोल्हापूर आवृत्ती मध्ये दिनांक 12 सप्टेंबर च्या अंकात प्रकाशित झाली होती. बातमी वाचताच माजी विद्यार्थी, नेते व शेकाप प्रकल्पग्रस्त नेते प्रा विजयभाई पाटील-जंगमहट्टी कर यांनी चंदगड आगारप्रमुख सतीश पाटील व वाहतूक नियंत्रक सूर्यकांत गडकरी यांच्याशी तातडीने भ्रमणध्वनी वरून एक सारखा संपर्क साधला कोल्हापूर विभागीय प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तिलारीनगर कोदाळी कळसगादे पाटणे जेलुगडे आंबेवाडी जंगमहटी किटवडे कलिवडे रायदेंवाडी हलकर्णी नाईकवाडा या गावच्या शेकडो विद्यार्थी व पालकांसह रास्ता रोको करण्याचा इशारा दिला व ताबडतोब दुपारी अडीच वाजता पाटणे फाटा मार्गे तिलारीनगर एसटी सुरू करण्याची मागणी केली. याचा तात्काळ परिणाम होऊन सोमवार दिनांक 15 सप्टेंबर पासून दुपारी दोन वाजता चंदगड ते पाटणे फाटा व पुढे तिलारी नगर व पुन्हा तिलारी नगर कोदाळी पाटणे फाटा ते चंदगड परतीची फेरी अशी सेवा सुरू करण्यात असल्याचे सतीश पाटील चंदगड एसटी आगारप्रमुख यांनी प्रा. विजयभाई व्ही पाटील यांना भ्रमणध्वनी वरून सांगितले.
सदर बस फेरी शेकडो विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार असून ही बस फेरी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी तसेच संध्याकाळी सहा वाजता पाटणे फाटा मार्गे तिलारीनगर ही नवीन बस फेरी सुरू करण्यासाठी मुख्य कोल्हापूर कार्यालयापर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती प्रा.विजयभाई पाटील यांनी पत्रकारांना दिली.
या दुपारच्या सुरू होणारे एसटी बस सेवेचा लाभ सर्व संबंधित गावच्या विद्यार्थी प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन विद्यार्थी नेते प्रा विजयभाई पाटील-जंगमहट्टीकर व चंदगड आगार प्रमुख सतीश पाटील यांनी विद्यार्थी व प्रवाशांना केले आहे.