DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड
कोल्हापूर :- दोन लाख आडुसष्ठ हजाराची गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी सचिन हाण्णाप्पा नाईक वय 34 वर्षे रा. आमरोळी ता. चंदगड जि. कोल्हापुर याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार आमरोळी गावचे हद्दीत कुमरी रोडवर आरोपीचे राहते पराने मागील बाजुस असलेल्या जनावराचे गोठधामध्ये 16,800 रूपयाची गोल्डन एस ब्ल्यु फाईन व्हीस्की कंपनीचे गोवा बनायटीच्या 336 बाटल्या 27,000 रुपये गोल्डन एस ब्ल्यु फाईन व्हीस्की कंपनीचे गोवा बनावटीच्या बाटल्या, 9,000 रूपयांच्या गोल्ड अॅन्ड ब्लॅक रन कंपनीचे गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 750 मिलीच्या 60 बाटल्या 1,18,560 रूपयांच्या रिसर्ह रेजर 7 व्हिस्की कंपनीचे गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 750 मिलीच्या 156 बाटल्या, 19,200 रूपयांच्या रॉण्ड प्रिमीयन ग्रेन व्हिस्की कंपनीचे गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 750 मिलीच्या 24 बाटल्या
6] 30,000/- हेयर्ड्स व्हिस्की कंपनीचे गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 180 मिलीच्या 240 बाटल्या, 26880 रूपयांच्या डीएसपी ब्लॅक व्हिस्की कंपनीचे गोवा बनावटीच्या लेबल असलेल्या 750 मिलीच्या 48 बाटल्या, 13,440 रुपये डीएसपी ब्लॅक व्हिस्की कंपनीचे गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 180 मिलीच्या 96 बाटल्या. 7,200 रुपये नॅक्डोवेल्स नं 01 कंपनीचे गाँवा बनावटीचे लेबल असलेल्या 750 मिलीच्या 12 बाटल्या मिळुन आल्या. महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या दारुच्या वेगवेगळ्या कंपनीच्या सिलबंद बाटल्या विक्रीकरीता स्वतः जवळ दारू विक्री परवाना नसताना बेकायदा बिगर परवाना दारुबंदी गुन्ह्याचे एकूण 2,68,080/- रू. किमतीव्या गोवा बनावटीच्या दारु कब्जात बाळगलेला मिळुन आलेने गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची फिर्याद नितीन आबासाहेब पाटील पोलिस कॉन्स्टेबल यांनी ठाणे अंमलदार कांबळे यांना दिली.
अधिक तपास पोलिस सब ईन्सपेक्टर शितल धविले, चंदगड पोलीस ठाणे हे करीत आहेत.