DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – सचिन कोळी शिरोळ
इचलकंरजी:- जयसिंगपूर, शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत वाढती घरफोडी रोखण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक सो, कोल्हापूर, मा. पोलीस उपअधिक्षक सो, गडविभाग, इचलकरंजी तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपुर विभाग, जयसिंगपूर यांनी घटनास्थळी भेटी देवुन वेळोवेळी मा. पोलीस निरीक्षक शिरोळ पोलीस ठाणे यांना सुचना देवुन घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करुन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याचे आदेशित केले होते.
वरीष्ठांच्या सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, शिरोळ पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी, डी.बी. पथक व अमंलदार यांना सुचना देवुन घरफोडी उघड आनणेकामी माहिती काढुन संशयीत इसम यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरी झाले ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज, तसेच घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार यांचेवर वॉच ठेवुन गुन्हा घडकीस येणेकरिता प्रयत्न करीत असताना पोलीस अंमलदार युवराज खरात यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मार्फत हरोली गावी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार रहाणेस असलेबाबत माहिती मिळाली. त्याचेवर वाँच ठेवला होता. दि. १८/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व पोलीस स्टाफ हरोलीगावात एक इसम संशयीत रित्या फिरताना दिसला तो पळुन जात असताना त्यास पोलीस अमंलदार पो.हे. कॉ १०११ बाबाचाँद पटेल, पो.कॉ ८९९ युवराज खरात, २५२२ संजय राठोड, १५१२ नितीन साबळे यांनी शिताफीने पकडून सुनित महादेव निकम, वय २८, रा. गजबरवाडी, ता. निप्पाणी, जि. बेळगाव (कर्नाटक) सध्या रा. हरोली, ता. शिरोळ, जि. कोल्हापर संशयित आरोपीची पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ एक सोन्याची अंगठी मिळुन आली त्याबाबत चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणुन अधिक चौकशी अंती त्याने काही दिवसापुर्वी हरोली येथे घरफोडी केली असलेची कबुली दिली. सदरचा आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्यास विश्वासात घेवुन अधिक माहिती घेतली असता त्याने कबुनर, इचलकंरजी, हरोली, नांदणी, संभाजीपूर येथे घरफोडी केली असलेची कबुली दिली. त्याबाबत शिवाजीनगर व शिरोळ पोलीस ठाणेकडील क्राईम अभिलेख तपासले असता वरील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असलेची खात्री झाली. त्यामुळे आरोपीने दिले माहितीप्रमाणे पंचासमक्ष पंचनामा करुन चोरीस गेलेला सोने चांदीचा मुद्देमाल तसेच आरोपीत याने गुन्हयात वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आलेली आहे.
आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी कर्नाटक राज्यात संकेश्वर, निप्पाणी तसेच कोल्हापूर जिल्हातील कागल, गोकुळशिरगाव, हुपरी, गडहिंग्लज, मुरगुड, आजरा, शहापूर व कुरुंदवाड इत्यादी पोलीस ठाणेत घरफोडीचे तसेच इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीत यास अटक करुन दिनांक १९/०९/२०२४ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, जयसिंगपूर यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आज दिनांक २३/०९/२०२४ रोजी अखेर पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली होती. त्यानंतर आज पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मिळणेकामी मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीत याची दिनांक २५/०९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.