DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- नारायण कांबळे
कोल्हापूर :- इसम नामे नितीन मानसिंग भोसले वय 30 वर्ष, राहणार-फडणाईक कॉलनी, वारणानगर, कोल्हापूर मुळगाव - मोहरे, तालुका- पन्हाळा, जिल्हा-कोल्हापूर याचा आज सकाळी नवे पारगाव येथे मोटरसायकलसह मृतदेह मिळून आला. प्रथम दर्शनी त्याचा खून केला असावा, अशी शंका आल्याने वडगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास करणेस सुरुवात केली. तपासादरम्यान काही इसमांना ताब्यात देखील घेण्यात आले. दरम्यान मयत नितीन भोसले यांचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मयत इसमाचे डॉक्टर श्रीमती गावडे यांनी शवविच्छेदन केले असता मयत नितीन भोसले यांच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच मयत नितीन भोसले याचे अंगावर भाजल्याच्या तसेच फुफ्फुस देखील जळाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे *नितीन भोसले याचा कोणीही खून केला नसून त्याचे अंगावर वीज पडून त्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे* स्पष्ट झाले आहे.