DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी. प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर:- मजरे कार्वे ता. चंदगड येथे वडील दारू पीत असल्याच्या नैराश्येतुन कु.प्रयास पांडुरंग पाटील (वय १७) मुळ गाव किटवाड सध्या रा. मजरे कार्वे याने रविवार दि. 13/10/2024 रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत राजेंद्र निंगाप्पा इंजल यांनी चंदगड पोलिसात वर्दी दिली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार प्रयास याने वडील पांडुरंग पाटील दररोज दारू पिऊन घरात गोंधळ घालतात, त्याच नैराश्येतुन त्याने घरातील हॉल मध्ये छताच्या हुक्काला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदगड येथील ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदन करून मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी सकाळी दहा वाजता किटवाड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.अधिक तपास पो. हे. कॉन्स्टेबल अमोल पाटील करत आहेत. या घटनेने कार्वेसह किटवाड परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पाटणे फाटा, कार्वे परिसरात जुगार, मटका, दारू, गांजा व्यवसाय मोठया प्रमाणात सुरु असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आजच्या तरुण महाविद्यालयीन युवा वर्गावर होत आहे.त्यामुळे हे अवैध धंदे तातडीने बंद झाले पाहिजेत अशी पालक वर्गातून प्रतिक्रिया उमटत आहेत.