सुरत-नागपूर महामार्गवर, कुसुंबानजीकची विदारक स्थिती, प्रतीक्षा कायम
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे तालुका प्रतिनिधी- संकेत बागरेचा, नेर
धुळे-: धुळे तालुक्यातील नागपूर-सुरत महामार्गावरील कुसुंबा गावाजवळ २४ जुलैला उड्डाणपुलावर खड्डा पडला होता. त्या दिवसापासून लोणखेडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे काम केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना लागून आहे.
११ ऑगस्टला या कामाची गुणवत्तासंदर्भात नागपूरस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील स्वतंत्र एजन्सीमार्फत नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर कामाच्या नमुन्यात नेमके काय आढळले? याचे उत्तर अद्याप महामार्गाच्या पटलावर दिसत नाही. तब्बल दोन महिने उलटूनही उड्डाण पुलाच्या खड्धाचे काम सुरू झाले नाही. कामाच्या दर्जाचाबत शंका उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी
बोलण्यास दिला नकार बऱ्याच दिवसांपासून येथील खड्याचे काम जैसे थे’ अवस्थेत आहे. सध्या येथील वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, वळवलेल्या वाहतुकीच्या ठिकाणी अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. या कामाच्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष काळजी या विभागाने घ्यावी. नियुक्त केलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी कामाबाबत बोलण्यास नकार दिला.
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कुसुंबानजीक विदारक स्थिती. या कामाच्या बाबतीत दखल घेऊन प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. दररोज या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. सध्या या एकाच उड्डाण पुलावर या वाहनांचा भार पडला आहे. त्यामुळे आहे तो उड्डाण पूल टिकावा ही अपेक्षा आहे. नागपूर-सुरत महामार्ग १४० किलोमीटर अंतरावरील कामाच्या
गुणवत्तेसंदर्भात वेळोवेळी तक्रारी झाल्या आहेत. ठरवून दिलेल्या डेडलाइनपेक्षा काम लांबणीवरच पडले आहे. कुसुंबा उड्डाण पुलावर खड्डा वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उड्डाण पुलावरील १२० मीटर अंतरावरील कामाचे नमुने ड्रिल
मशीनने चार ते पाच ठिकाणांहून घेतले आहेत. नागपूरची एजन्सी किती दिवसांत काय अहवाल देते, नेमका कशामुळे खड्डा पडला, याचे उत्तर या अहवालात असणार आहे. या अहवालात स्वतंत्र एजन्सी काय उपाययोजना सांगते याकडे लक्ष लागून आहे.