DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
अमरावती:- विशाल वानखडे यांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत अतिशय हालखीच्या परिस्थिती मध्ये श्री गाडगे बाबा समाधी मंदिर अमरावती येथे राहून. आपले विद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. खाजगी का होईना कमी वयात शिक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केलेत. शैक्षणिक क्षेत्रातून सामाजिक वसा जोपासण्याचा त्यांनी संकल्प घेतला आहे, शिक्षण क्षेत्रचं न्हवे तर क्रीडा क्षेत्रात सुद्धा विशेष प्रसिद्धी त्यांनी मिळवली आहे.मार्शल आर्टस्.बॉक्सिंग, ज्युडो, तायकॉन्डो, या खेळामध्ये त्यांनी 2 डिग्री ब्लॅक व महाराष्ट्र राज्य रेफरी थाई बॉक्सिंग असोसिएशन पदवी मिळवली आहे. या सारख्या खेळामध्ये उत्कृष्ट असे कार्य करून.त्यांनी विविध सम्मान पदक व सत्कार पटकावले आहेत.अशी आपली अलौकिक छाप क्रीडा क्षेत्रात उमटवली आहे.तसेच सामाजिक कार्या मध्ये छोटे छोटे उपक्रम घेऊन नेहमी अग्रेसर राहून सहभाग घेतात.शिक्षक व्यवसायात 5 वर्षांच्या अतिशय कमी कालावधीत त्यांनी मोठी उपलब्धी मिळवली आहे.कुठल्याही व्यसनाच्या अधीन न जाता.स्वतःचा वेळ हा पुस्तके, ग्रंथ, कथा, कादंबरी वाचण्यात व काव्य लेखनात घालवतात. महामानवाच्या विचारसरणी वर पाऊल ठेऊन चालणारे वानखडे सर हे आजच्या तरुणांचे एक आदर्श बनले आहेत. असे खेळतं आनंदी व्यक्तिमत्व, विध्यार्थ्यांचे मित्र लाडके शिक्षक म्हणून ओळख असलेले. सरांचे कार्य हे अभिनंदनीय समाज हितोपयोगी ठरले आहे.
वानखडे सर हे मूर्तिजापूर येथील नामांकिन शाळा श्रीमती सरला राम काकानी एज्युकेशन अकॅडमी येथे कार्यरत आहेत.नेहमी विध्यार्थ्यांना वर्गात हसत खेळत आणि विविध शिक्षण तंत्राचा वापर करून मुलांना सोप्या पद्धतीने वर्गात आनंदी वातावरण बनवून शिकवतात. याचीच दखल घेत तरुणाई फाउंडेशन संस्थेने श्री गाडगे महाराज गौरक्षण संस्था मूर्तिजापूर.येथील तरुण गुणवंत शिक्षक विशाल वानखडे सर यांच्या कार्य बघून २०२४ डिसेंबर मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव “शिक्षकरत्न पुरस्कार” जाहीर केला आहे. ही आनंदाची बातमी नियुक्ती पत्राने कळविले आहे.
त्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.