सांगली :- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे
सांगली :- पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसअवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कडील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ ( कर्मचारी ) यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमाची माहिती काढूनत्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते.त्या अनुषंगाने दिनांक 12/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोहेकॉ कुबेर खोत व पोशि अभिजित ठाकरे यांना गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली कि,एक इसम इटकरे फाटा येथे येणार असून त्याच्या कबज्यात पिस्टल आहे. नमूद पथकाणे मिळालेल्या माहितीनुसार इटकरे येथे वाॅच केला असता एक इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला.
तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नांव व गांव विचारता त्याचे नांव 1) नयन लक्ष्मण पाटील, वय 21 वर्षे रा. नारायणटेक टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे असल्याचे सांगितले.
सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याची अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता. त्याच्या पँटच्या खिशात देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझीनसह व दोन जिवंत काडतूसे मिळून आले. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूसे बाळगणे बाबत त्याच्याकडे परवाना आहे काय या बाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
लागलीच त्याच्याकडे अग्निअस्त्रे व जिवंत काडतूसे पुढील तपास कामी सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमोर जप्त करून आरोपी विरुद्ध पोशि / अभिजित ठाणेकर यांनी कुरळप पोलीस ठाणे फिर्याद देईन भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कुरळप पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कुरळप पोलीस ठाणे करीत आहे.