DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – संदीप सकट
कोल्हापूर:- चंदगड तालुक्यातील पाटणे वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी कर्मचारी नियतक्षेत्र माडवळे येथे रात्रगस्त करत असताना संशयित आरोपी मारुती बाबू लाडलक्ष्मीकर, वय वर्ष ३१ रा. शिरगांव ता. चंदगड जि. कोल्हापुर ,महेश तुकाराम सावंत, रा. हलकणों, वय २९ वर्षे, ता.चंदगड, जि. कोल्हापुर हे संशयीतरित्या शिकारीच्या उददेशाने दुचाकी गाडी क्र.MH-०९/CN-१८६७ फिरत असताना मिळून आले. त्यांना अटकाव करून अधिक तपास केला असता, त्याचेकडे ९९ जिवंत बॉम्ब व एक सत्तुर मिळून आला त्यांच्या कडून ते जप्त करुन ताब्यात घेण्यात आले वनरक्षक माडवळे यांनी त्यांचेकडील प्र.गु. रिपोर्ट क्र.WL-०१/२०२४ दि.१५-१०-२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता गुन्हा नोंद केला असुन आरोपी यांचेकडून दोन मोबाईल जप्त केले. दोघांना मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंदगड यांचे समोर हजर केले असता आरोपीना न्यायालयाने दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे (प्रा) प्रशांत आवळे व वनपाल तुडीये बाळासाहेब भांडकोळी, यांच्या सह वनपाल कार्य जॉन्सन डिसोजा, वनरक्षक माडवळे प्रकाश मारुती शिंदे, वनरक्षक मेघराज हुल्ने, खंडू कातगाडे, वनरक्षक गणेश भालेराव, वनरक्षक श्रेयस रायके, वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बदिकर हे अधिक तपास करीत आहेत.